जानवळे येथे मनसेचा जलसंधारणासाठी पुढाकार; भव्य वनराई बंधाऱ्याची उभारणी

जानवळे येथे मनसेचा जलसंधारणासाठी पुढाकार; भव्य वनराई बंधाऱ्याची उभारणी

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून स्तुत्य उपक्रम; जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा पुढाकार

आबलोली (संदेश कदम) :

उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

 

भविष्यात गावात निर्माण होणारी पाणीटंचाई कमी व्हावी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढावा तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी, या हेतूने या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या कामासाठी विनोद जानवळकर यांनी ग्रामस्थांना श्रमदानाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जानवळे गावातील ग्रामस्थांसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी शृंगारतळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य प्रमोद गांधी, मनसे जिल्हाध्यक्ष मनीष पाथरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेतले, जानवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी विखारे, शेतकरी संघटना गुहागर तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, सचिन गडदे, शिवसेना विभागप्रमुख पिंट्या संसारे, ग्रामसेवक गोरखनाथ सोनवणे, अपेक्षा हळदणकर, चिपळूणच्या अॅड. वृषाली सावंत, राजेंद्र गोजारे, मंगेश धामणस्कर, मुसतकीन शाह, अलताफ शेख, विनोद चिपळूणकर, जितेंद्र शिरगांवकर, प्रवीण लांजेकर, कमलाकर वनगे, सुजित गांधी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

गावाच्या पाणीप्रश्नावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष श्रमदानातून उपाययोजना करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. जलसंधारणाच्या कामासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें