नरवण येथे ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम दीपोत्सवाचे भव्य आयोजन!

नरवण येथे ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम दीपोत्सवाचे भव्य आयोजन!

 

१० नोव्हेंबर रोजी कोकणच्या पारंपरिक लोककलेचा ‘महिलांचे प्रबोधनवादी नमन’ कार्यक्रम; दीपप्रज्वलन, आरती व भजनांचीही मेजवानी

नरवण (गुहागर) : श्रीराम भक्तीचा जागर आणि कोकणच्या पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने मौजे नरवण, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने रविवार, दि. ८ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भव्य श्रीराम दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.

 

सन २००८ मध्ये स्थापन झालेल्या श्रीराम दीपोत्सव मंडळाचा यंदा १९ वा दीपोत्सव साजरा होत आहे. या उत्सवासाठी मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

 

रविवार, दि. ८ नोव्हेंबर : सायंकाळी ७.३० वाजता दीपप्रज्वलन व आरती होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रणवजी पोळेकर साहेब व श्री. निलेशजी सुर्वे साहेब उपस्थित राहणार आहेत.

 

सोमवार, दि. ९ नोव्हेंबर : सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामाची आरती होणार आहे.

 

मंगळवार, दि. १० नोव्हेंबर : सायंकाळी ७.३० वाजता आरती, तर रात्री १० वाजता कोकणच्या पारंपरिक लोककलेचा अविष्कार असलेला महिलांचा प्रबोधनवादी नमन कार्यक्रम सादर होणार आहे. साई समर्थ सेवा मंडळ, सळपेेवाडी-गुहागर (चिंद्रावळे) निर्मित आणि साई कलामंच, सळपेेवाडी प्रस्तुत हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

 

बुधवार, दि. ११ नोव्हेंबर : सायंकाळी ७.३० वाजता आरती व स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

या चार दिवसीय दीपोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकोपा, भक्तिभाव आणि कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. विशेषतः महिलांनी सादर केलेले पारंपरिक प्रबोधनवादी नमन हा कार्यक्रम दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.पी

या उत्सवाला परिसरातील सर्व रामभक्त, ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम दीपोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ, नरवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

॥ श्रीराम प्रसन्न ॥

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें