_*पाचेरी सडा नं.1 शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवले घवघवीत यश
गुहागर /पाचेरी सडा : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं. १ या शाळेतील इयत्ता सातवीच्या दोन विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. मानवी अजित पंडये व अर्णव आनंद काजरोळकर या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे
या यशाबद्दल *गुहागर-चिपळूण- खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा मा. श्री. भास्करशेठ जाधव साहेब* यांच्या हस्ते आमसभेत दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांतजी जाधव साहेब* , *जिल्हा परिषद सदस्य श्री. महेशजी नाटेकर साहेब* , तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, तालुक्याचे *सभापती श्री. प्रणवजी पोळेकर साहेब* , *उपसभापती श्री. निलेशजी सुर्वे साहेब*, सर्व पंचायत समिती सदस्य , तहसीलदार श्री. पाटील साहेब , गटविकास अधिकारी श्री. शिंदे साहेब , गटशिक्षणाधिकारी श्री. गळवे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख सौ. गीतांजली जाधव मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वपूर्ण ठरली. या यशाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ पाचेरी सडा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पाचेरी सडा शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.











