कोंडगाव बाईंगवाडी जलजीवन योजनेची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिषदेला पत्र

कोंडगाव बाईंगवाडी जलजीवन योजनेची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा परिषदेला पत्र

संगमेश्वर – तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेच्या तक्रार अर्जाची दखल घेत, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत.

*कोंडगाव बाईंगवाडी येथील रहिवासी श्री. निलेश अशोक सावंत यांनी ३० जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एक तक्रार अर्ज सादर केला होता. जलजीवन मिशन अंतर्गत कोंडगाव बाईंगवाडी पाणी योजनेमध्ये ४०.२१ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप या अर्जात करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी अर्जदाराने केली होती.

*या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव श्री चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद रत्नागिरी यांना पत्र पाठवले आहे.
*सदर विषय हा जिल्हा परिषद कार्यालयाशी संबंधित असल्याने, तक्रार अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असे या अधिकृत पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती अर्जदाराला देऊन त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, असेही निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.
*या अधिकृत पत्रव्यवहारानंतर आता जिल्हा परिषद प्रशासन या तक्रार अर्जावर काय पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें