धक्कादायक प्रकार -रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटलीबाबत प्रवाशाची तक्रार

– धक्कादायक प्रकार -रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटलीबाबत प्रवाशाची तक्रार

१० रुपयांची छोटी बाटली मागितल्यावर नकार; २० रुपयांच्या ‘PERFECT’ बाटलीवर पॅकेजिंग तारीख आणि बॅच नंबर नसल्याचा आरोप

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करताना एका प्रवाशाला विचित्र अनुभव आल्याची घटना समोर आली आहे. दहा रुपयांची छोटी पाण्याची बाटली मागितल्यानंतर स्टॉलधारकांनी ती उपलब्ध नसल्याचे सांगितले. अनेक स्टॉलवर चौकशी करूनही तेच उत्तर मिळाल्याने अखेर नाईलाजाने २० रुपयांची मोठी बाटली खरेदी करावी लागल्याचे संबंधित प्रवाशाने म्हटले आहे.

 

विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या बाटलीवर ‘PERFECT’ हा ब्रँड नमूद होता. मात्र, बाटलीच्या लेबलवर पॅकेजिंग तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत पाणी वापरण्याची मुदत असल्याचे लिहिलेले असताना, पॅकेजिंग तारीख पाहण्यासाठी ‘See Cap/Neck’ असा उल्लेख करण्यात आला होता.

 

प्रवाशाने बाटलीचे झाकण आणि मान तपासली असता, त्यावर पॅकेजिंग तारीख, बॅच नंबर किंवा मुदत संपण्याची तारीख कुठेही दिसून आली नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बाटलीतील पाणी नेमके कधी भरले आहे, त्याची वैधता किती आहे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

याबाबत स्टॉलधारकांकडे विचारणा केली असता उद्धटपणे उत्तरे मिळाल्याचाही आरोप संबंधित प्रवाशाने केला आहे. या प्रकाराची दखल घेत प्रवाशाने रेल्वेच्या ‘RailMadad’ या अधिकृत तक्रार प्रणालीवर तक्रार नोंदवली आहे.

 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. बाटलीबंद पाणी खरेदी करताना त्यावरील पॅकेजिंग तारीख, बॅच नंबर, वापरण्याची अंतिम मुदत आणि सील व्यवस्थित असल्याची खात्री करावी, असे आवाहनही या प्रवाशाने केले आहे.

 

दरम्यान, रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील या प्रकाराची कोकण रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन संबंधित स्टॉलची तपासणी करावी आणि प्रवाशांच्या तक्रारीची चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें