महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तर्फे शिक्षक श्री मधुकर गंगावणे यांचा सत्कार
गुहागर– एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर येथे नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री मधुकर गंगावणे यांचा एज्युकेशन सोसायटीचे सचिव व जनता प्रतिष्ठानचे सल्लागार श्री संदीप भोसले यांचे शुभ हस्ते शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.श्री मधुकर गंगावणे सर यांनी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान आयोजित संविधान रॅली ,वृक्षरोपण, सुशासन डे तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिन इत्यादी कार्यक्रम आयोजनामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे.तसेच ते विद्यालयातील हरहुन्नरी शिक्षक असून विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमांमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सूत्रसंचालन केले .सदर प्रसंगी ऍडव्होकेट शेंडेकर, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज पाटील, उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे मॅडम ,गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शामल आरेकर मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते