आबलोली येथील श्री. बबन मोतीराम काजरोळकर यांचे दु:खद निधन
आबलोली (गुहागर) – आबलोली गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. बबन मोतीराम काजरोळकर यांचे गुरुवार, दिनांक १३ मार्च २०२५ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण आबलोली पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६६ वर्षे होते.
कै. बबन मोतीराम काजरोळकर हे मनमिळाऊ, हसतमुख आणि सर्वांना आपलेसे करून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. समाजात घडून-मिसळून वागणारे, दुसऱ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे सातावे दशक्रिया विधी बुधवार, दिनांक १९ मार्च २०२५ रोजी तर बारावे उत्तरकार्य रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे.
कै. बबन मोतीराम काजरोळकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.