श्रमिक विद्यालयातील तीन विद्यार्थीचे नवोदय प्रवेश परीक्षा पात्र उज्वल यश संपादन
रत्नागिरी – संदीप शेमणकर
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता ८ वी. मध्ये श्रमिक विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी येथे या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी. साठी प्राप्त झाला आहे.
कुमार प्रणेश सुनील कुळये ,कु. आर्या विश्वनाथ मोर्ये,कु. सिद्धी सूर्यकांत भरणकर इयत्ता ८ वी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. सातत्यपुर्ण अभ्यासाने या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.मुख्याध्यापक मधुकर थुळ सर ,तरळ सर,बांबाडे सर,मांडवकर सर ,भांडेकर मॅडम, तेंडुलकर मॅडम व वाळींबे मॅडम या शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
मा.नंदकुमारजी मोहिते सर यांचे नेहमीच लाभलेली प्रेरणा या यशामागे अत्यंत मोलाची आहे.प्रवेशपात्र विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत असुन शिक्षण संकुलाच्या यशोगाथेमध्ये अजून एक दैदिप्यमान नोंद विद्यार्थ्यांनी केली आहे.