विसापूर तिसरी वाडी येथे आई ग्रामदेवतेचे जल्लोषात आगमन सोहळा संपन्न….
गुहागर- विसापूर
विसापूर तिसरी वाडी येथे आई ग्रामदेवतेचे आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात जल्लोषात संपन्न झाला. या आगमन सोहळ्यात बहुसंख्येने भक्तजन उपस्थित होते. पालखी वाडीमध्ये आली की प्रथम तिला शिवसभागृहामध्ये बसण्याचा पहिला मान आहे. कोकणात शिमगा सण म्हणजे मुख्य आकर्षण असतो. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात,त्या होळी सणाला कोकणात शिमगा म्हणतात . गावागावात प्रत्येक घरात सनई ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी फिरवली जाते. घरोघरी देव आपल्याला भेटायला येणार हा आनंद गगनात मावेनासा असतो. पालखी समोर गाऱ्हाणं (नवस) लावले जातात. देवाची मनोभावे पूजा करुन गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. सायंकाळी घरे घेऊन झाली कि पालखी मोठ्या हर्षमनाने जल्लोषात महिला-पुरुष लेझीमवर नाचवून पालखी मोठ्या उत्साहात पुन्हा सानेवरती स्थानापणासाठी नेण्यात येते.
बातमी सचिन Dj याचे कडून.