गुहागर तालुक्यातील दोडवली गावाचा शिमगोत्सोव आणि पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न.
गुहागर – मौजे दोडवली
गुहागर तालुक्यातील दोडवली गावातील ग्रामदैवत स्वयंभु श्री नागेश्वर देव,श्री चनकाई देवी, श्री कालिकाई देवी, श्री पावनाई देवीचा उत्सव सोहळा.
शिमगोत्सोव आणि पालखी सोहळा दिनांक ११मार्च २०२५ रोजी मध्यरात्री पालखी मंदीरातुन सहाणेवर निघाली १२ मार्च १३मार्चला दोन दिवस मानाचा होम प्रारंभ होऊन शिमगा उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर पाच दिवस पालखी सहाणेवर विराजमान झाली त्यानंतर दिनांक १९ मार्च रोजी रंगपंचमीच्या मुहूर्तावर पालखी गावातील मानकरयांच्या घरी जाऊन आणि गावातील वाडीवाडीवर प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक भावीकानी मनोभावे पुजा केली प्रयेक वाडीने उत्साहात स्वागत केले यामधे विठ्लवाडी वरची कांबळेवाडी नामदेव वाडी देऊळवाडी ,मोडेवाडी या सर्व ठिकाणी पालखी गेल्यानंतर शेवटी बौद्धवाडी येथील जुनी सहाण येथे आपल्या माना साठी पोहचली आणि तीथुन पालखीला निरोप देण्यातसाठी जुनी सहाण ते ग्रामदेवता मंदीरपर्यंत भव्य दिव्य मीरवणुक काढण्यात आली ग्रामदेवतेला निरोप देण्यासाठी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मुंबईकर तरुणवर्ग पाहुणे मंडळी मोठ्या संखेने उपस्थीत होते या निमित्ताने आलेल्या सर्व भावीकानसाठी दोडवली मनसेच्या वतीने लाडु पाण्याची व्यवस्था आणि फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली होती अशाप्रकारे ग्रामदेवतेला मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला ????????अशाप्रकारे दोडवलीचा शिमगोत्सोव पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
बातमी – सचिन Dj यांचेकडून