परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा

परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा

परभणी : महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आवाहन केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात कांद्याचा आणि कापसाचा हार घालून प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी जोरदार मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आक्रमक झाल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे.

अजित पवारांचे वक्तव्य आणि शेतकऱ्यांचा रोष

अजित पवार यांनी बारामती येथे आयोजित मेळाव्यात कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे या वर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी देण्याची परिस्थिती नाही.” तसेच, “सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही,” असे सांगत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा दाखला दिला. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत शेतीसाठी कर्ज दिले जाते. अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कर्ज भरण्यासाठी विलंब केला होता. मात्र, सरकारने कर्जमाफीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकरी अस्वस्थ असून, त्याचा संताप आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन* ■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली...
Read More
बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा   काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4...
Read More
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून...
Read More
कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे...
Read More
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त  आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे माहिती...
Read More
केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याबाबतची वस्तुस्थिती समोर; राज्य संरक्षित...
Read More
गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रामपंचायत...
Read More
फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.   लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण- परिसरातील तब्बल...
Read More

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी रत्नागिरी, दिनांक २८...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी  सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी तामिळनाडू पोलिस दलात पोलीस अधीक्षक पदाची धुरा; अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण...
Read More
संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी