आता कसं वाटतयं सिटीत नाव गाजतयं – आता कस वाटतयं सिटीत आबलोली गाव गाजतयं.
“चल भावा सिटीत” झी मराठीचा रिॲलिटी शो आबलोलीत उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली कोष्टेवाडी येथील मधुकर रेपाळ यांच्या घरासमोरील पटांगणात मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून खास महिलांसाठी “खेळ मनोरंजनाचा..!”, ” खेळातून बक्षिसे जिंकण्याचा..!” “चल भावा सिटीत” हा झी मराठीचा नवीन रिॲलिटी शो नुकताच आबलोली गावात उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते झी मराठी टीमचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली या मंडळाचे उपाध्यक्ष अजित रेपाळ यांनी केले त्यानंतर झी मराठी तर्फे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. नम्रता जयंता निमूणकर,विठ्ठल रखुमाई महिला मंडळ आबलोली या मंडळाच्या अध्यक्षा सौ.अस्मिता अनिल रेपाळ,बचत गटाच्या सीआरपी सौ. मिनल संदेश कदम,सौ.शितल दिंडे (आंबव),विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर,उपाध्यक्ष अजित रेपाळ,आबलोली गावचे स्थानिक पत्रकार संदेश कदम आदी.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झी मराठी या रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्हि स्टार श्री. मयुरेश अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात मनोरंजनाची धमाल करीत महिलांना गाण्याच्या ठेक्यावर नाचायला लावले “आता कस वाटतयं..!,सिटीत गाव गाजतयं..!,” आता कस वाटतयं..!,”सिटीत आबलोली नाव गाजतय..!”आणि उपस्थित सर्व महिलांनी नाचण्याचा आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी झी मराठीचे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आणि प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेतला यावेळी या कार्यक्रमातही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हा रिॲलिटी शो आबलोली गावात संपन्न होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची श्रीमती.नम्रता जयंता निमूणकर, विठ्ठल रखुमाई महिला मंडळ आबलोली या मंडळाच्या अध्यक्षा सौ. अस्मिता अनिल रेपाळ,बचत गटाच्या सीआरपी सौ. मिनल संदेश कदम,शितल दिंडे(आंबव) यांनी विशेष प्रयत्न केले.या स्पर्धेत समृद्धी सुधाकर भोजने, मृणाली महेंद्र रेडेकर, सुषमा सुधीर उकार्डे यांनी प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकांची बक्षीसे जिंकली त्यांना झी मराठी तर्फे रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली गावातील निर्मल ग्रामपंचायतीच्या सदस्या नम्रता निमूणकर, सौ. रुपाली कदम, माजी सभापती,सौ. वृषाली वैद्य, सौ. पायल गोणबरे, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे, तृप्ती पागडे,उज्वला पवार,साक्षी रेपाळ, इशा रेपाळ,उषा साप्ते,ज्योती गुरसळे ,गौरी रेपाळ,सविता रेपाळ,रतिषा उकार्डे,अस्मिता पवार,संघमित्रा कदम, गिता रेपाळ,प्रणाली पवार,अस्मिता पवार ,मयूरी रेपाळ,श्वेता उकार्डे,किर्ती निमूणकर,तेजल रेडेकर,कल्याणी नेटके,मयूरी रेपाळ,सायली दिंडे, यांचेसह आबलोली गावातील बचत गटांच्या महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.
याच कार्यक्रमात रिॲलिटी शो चे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर यांनी यापुढे आबलोली गावात याहीपेक्षा दर्जेदार कार्यक्रम आयोजित करेन आणि त्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी घेऊन येइन असा शब्द दिला आहे. या रिॲलिटी शो ला झी मराठीचे ॲंकर आणि टिव्ही स्टार मयुरेश अभ्यंकर, राजा कदम (राम कदम),प्रशांत रानडे,आदी.टिम उपस्थित होती. यावेळी विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.