इंद्रादित्य पेट्रोलियमचे भव्य उद्घाटन – चिपळूणच्या कळंबस्ते–काडवली मार्गावर नवा उपक्रम सुरू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इंद्रादित्य पेट्रोलियमचे भव्य उद्घाटन – चिपळूणच्या कळंबस्ते–काडवली मार्गावर नवा उपक्रम सुरू

राजकारणातल्या चार दशके समाजकारणात घालवलेल्या नेत्याची व्यावसायिक वाटचाल

चिपळूण (प्रतिनिधी) – आज चिपळूण तालुक्यातील खांदाट येथे ‘इंद्रादित्य पेट्रोलियम’ या नावाने नव्याने पेट्रोल पंपाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. कळंबस्ते–काडवली मुख्य मार्गावर वसलेला हा पंप येथील रहिवाशांसह प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गेली ४० वर्षे राजकारणात असूनही समाजकारणास प्राधान्य देणारे ज्येष्ठ नेते आ. भास्करशेठ जाधव, विक्रांत जाधव, समिर जाधव यांनी या नव्या उपक्रमात उतरून व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

 

या प्रसंगी बोलताना आ. भास्करशेठ जाधव  यांनी सांगितले की, “गेली अनेक वर्षे समाजासाठी काम करत आलो. वडिलांनी दिलेली शिकवण – कष्ट करा, चार पैसे कमवा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह इमानेइतबारे सांभाळा – या तत्त्वावर मी चालत आलो. त्याच मार्गावर आता माझी मुले समीर आणि विक्रांतसुद्धा चालत असून त्यांची कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर ‘इंद्रादित्य पेट्रोलियम’ची संकल्पना साकारली गेली आहे.”

 

उद्घाटन समारंभात चिपळूण अर्बन बँकेचे माजी चेअरमन श्री. संजयशेठ रेडीज, वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन श्री. प्रशांत यादव, श्री. अजमल दलवाई, श्री. गवाणकर, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक श्री. अमेय चांदोडकर, माजी नगरसेवक आणि बँक संचालक श्री. मिलिंद कापडी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या नवीन व्यवसायात गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोणताही व्यवसाय करताना मी स्वतः लक्ष घालतो. नीटस, शिस्तबद्ध कामकाज ही माझी प्राथमिकता असते. त्यासाठी मुलांनाही सतत मार्गदर्शन करत राहतो,” असे ते म्हणाले.

 

स्थानिक ग्रामस्थांनीही या पंपाच्या उद्घाटनाचे स्वागत करत यामुळे परिसरातील गरजा भागणार असल्याचे नमूद केले.

 

‘इंद्रादित्य पेट्रोलियम’च्या उद्घाटनामुळे या भागातील व्यवसायिक, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...