जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ मे रोजी रत्नागिरीत
नागरिकांच्या तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत सुनावणी
रत्नागिरी : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी १ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा करण्यात येतो.
लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करण्यासाठी प्रथम संबंधित तालुका लोकशाही दिनात अर्ज करणे अनिवार्य आहे. जर त्या उत्तराने समाधान न झाल्यासच जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी अर्ज करता येतो, असे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सा.प्र) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
#हॅशटॅग्स:
#लोकशाहीदिन #रत्नागिरी #जिल्हाधिकारी #नागरिकसुनावणी #DemocracyDay #RatnagiriNews
— संकलन: [सुजित सुर्वे ] | www.ratnagirivartahar.in