२६ वर्षांनी पुन्हा शाळेच्या उंबरठ्यावर – चंद्रकांत बाईत विद्यालयाच्या १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात १०वीच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलाप; शाळेला ५० खुर्च्यांची भेट
बातमी
आबलोली (संदेश कदम) –
गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत माद्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे सन १९९८-९९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात आणि भावनांनी ओथंबून संपन्न झाला. तब्बल २६ वर्षांनंतर या बॅचमधील सुमारे ३५ विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने झाली. दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला. अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब बाईत होते. या वेळी शिक्षक दिनेश नेटके, कर्मचारी प्रवीण सुर्वे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. अजित रेपाळ यांनी केले.
शाळेच्या दिवंगत माजी शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व उपस्थितांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तूंनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व आठवणी शेअर केल्या. श्री. नेटके व अध्यक्ष आबासाहेब बाईत यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री. विनोद पेढे यांनी सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला ५० नवीन खुर्च्यांची भेट दिली. पहिल्या सत्राच्या समारोपानंतर सर्वांसाठी अल्पोपहार व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
हॅशटॅग्स:
#स्नेहमेळावा #माजीविद्यार्थी #चंद्रकांतबाईतविद्यालय #गुहागर #आबलोली #शाळेच्याआठवणी #विद्यार्थीदिन
फोटो