‘लोकसंचालित साधन केंद्र, खेड’मध्ये बेकायदेशीर कारभार; अध्यक्षपदी अपर्णा महाडिक यांची घटनाबाह्य नियुक्ती
माहितीच्या अधिकारातून धक्कादायक उघड; अधिकृत कार्यकारिणीऐवजी अनधिकृत व्यक्तीचा कब्जा, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल
बातमी …..सुमित कुळे. खेड (RTI कार्यकर्ता)
रत्नागिरी, खेड : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘लोकसंचालित साधन केंद्र, खेड’ या संस्थेमध्ये बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या खुलाशानुसार, संस्थेची सध्याची कार्यकारिणी ही नोंदणीकृत अधिकृत दस्तऐवजनुसार वैध नाही. विशेष म्हणजे, संस्थेच्या अध्यक्षपदी अपर्णा महाडिक या व्यक्ती कार्यरत असून, त्यांच्या नावाचा कोणताही उल्लेख संस्थेच्या अधिकृत घटनेत नाही.
धर्मादाय आयुक्त कार्यालयात 1860 च्या संस्था नोंदणी अधिनियमाखाली नोंदणीकृत असलेल्या या संस्थेच्या अधिकृत कार्यकारिणीमध्ये सुषमा म. येवले (अध्यक्ष), संगीता भ. चव्हाण (उपाध्यक्ष), प्रिया अंकुश चव्हाण (सचिव), व सुभाषिनी संदीप शिबे (खजिनदार) यांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात ही कार्यकारिणी संस्थेच्या कामकाजात सहभागी नाही. उलट, अपर्णा महाडिक यांच्याकडे संस्थेची सर्व सूत्रे असून, कोणत्याही सभेचे आयोजन, निर्णयप्रक्रिया किंवा नियोजन हे पारदर्शक पद्धतीने केले जात नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
यापेक्षा गंभीर बाब म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी हे कार्यकारिणीचे सल्लागार असतानाही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. संस्थेचा अधिकृत पत्ता देखील वर्षानुवर्षे अद्ययावत करण्यात आलेला नाही, ही बाबही उघड झाली आहे.
या संपूर्ण प्रकाराची दखल घेत धर्मादाय आयुक्त न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे मुंबई मुख्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडेही संबंधित तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत.
या घटनांमुळे खेड तालुक्यात माविम अंतर्गत महिला बचत गटांच्या विश्वासार्हतेवर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संस्थेमधील पारदर्शकतेचा आणि कायदेशीरतेचा अभाव हा संपूर्ण व्यवस्थेवरच गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
⭕ तक्रार दार श्री.सुमित कुळे खेड माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी दाखल केले ली तक्रार ???? क्लिक करा
हॅशटॅग्स:
#खेड #माविम #रत्नागिरीबातमी #बेकायदेशीरकारभार #महिला_सक्षमीकरण #लोकसंचालितसाधनकेंद्र #माहितीअधिकार
फोटो