97% निकाल! बॅ. नाथ पै विद्यालय साखरची दहावीत घवघवीत कामगिरी
34 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण; यज्ञा राऊत प्रथम क्रमांकावर
✍️ राजू सागवेकर | राजापूर
राजापूर तालुक्यातील श्रमिक शिक्षण प्रसारक मंडळ साखरच्या बॅरिस्टर नाथ पै माध्यमिक विद्यालयाने यंदा दहावीच्या परीक्षेत 97% निकालाची उजळणी करत दमदार कामगिरी नोंदवली आहे. एकूण 34 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत उत्कृष्ट यश संपादन केलं आहे.
गौरवशाली यशप्राप्त विद्यार्थी:
प्रथम क्रमांक: यज्ञा रुपेश राऊत – 88.00%
द्वितीय क्रमांक: श्रुतिका सुनील देवळेकर – 85.00%
तृतीय (सहविजेते): मुग्धा मिलिंद मावळणकर आणि ओम विकास पडवळ – 83.40%
या यशामागे मुख्याध्यापिका सौ. राणे मॅडम यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचा समर्पित प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा त्रिवेणी संगम आहे. या यशाबद्दल साखर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
#दहावीचा_निकाल #नाथपैविद्यालय #राजापूर #शैक्षणिकयश #RatnagiriEducation #SSC2025
फोटो