प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट वतीने सत्कार.
सोलापूर ( नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी ),
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे
पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून गेली आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास इत्यादी पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून गेली आठ वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन देऊन राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे जीवाचे रान करीत असून पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी आपली हयात खर्ची घातली आहे पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे संपूर्ण महाराष्ट्रभर मोटरसायकलवर फिरत असून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर शासन दरबारी नेहमीच लढा दिला आहे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले असता वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी करत असलेल्या संघर्षाचे व कार्याचे कौतुक करून त्यांचा स्वामी समर्थ मंदिरातील कार्यालयात स्वामी कृपा वस्त्र व प्रसाद देऊन सत्कार केला तसेच प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.