गुहागर तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस – अनेक भागांत नुकसान
घरांवर झाडे कोसळली, विजेच्या झटक्याने वायरिंग जळाली; सुदैवाने जीवितहानी नाही
गुहागर (प्रतिनिधी):
गुहागर तालुक्यात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे भातगाव, पिंपर, हेदवी, अबलोली परिसरात मोठ्या प्रमाणावर विज पडल्याने आणि झाडे कोसळल्याने नुकसान झाले आहे. रस्त्यावर तसेच काही घरांवर झाडे कोसळल्याने रहदारी आणि स्थानिकांना अडथळा निर्माण झाला आहे.

भातगाव धक्का (गोळेवाडी) येथे मंगळवारी संध्याकाळी श्रीमती वनिता रा. गावडे यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील विजेचे बोर्ड, वायरिंग पूर्णतः जळाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी वेळीच याची माहिती संबंधित यंत्रणेला दिली आहे.
यावर्षी पाऊस अपेक्षेपेक्षा लवकर आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अचानक पावसामुळे नुकसानाच्या घटना समोर येत आहेत.
#गुहागर #मुसळधारपाऊस #वीजपडली #पावसाचेतेडकाळ #RatnagiriRain #GuhagarNews #NatureAlert
फोटो