रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; २३ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी
वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नवी मुंबई (मंगेश जाधव) | रत्नागिरी जिल्ह्यात २१ ते २३ मे २०२५ या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २१ व २२ मे रोजी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचे (ताशी ५०-६० किमी) सुद्धा संभाव्य धोके असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २३ व २४ मे रोजी देखील जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात असे आवाहन केले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी mausam.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आपत्कालीन स्थितीत खालील हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज चमकत असताना घ्यावयाची काळजी:
संगणक, टीव्ही यांसारखी विद्युत उपकरणे बंद ठेवून प्लग काढून टाकावेत.
मोबाईल आणि दूरध्वनीचा वापर टाळावा.
घराबाहेर जाणे टाळावे.
उंच झाडे, विजेचे खांब, मोकळा मैदान यापासून लांब रहावे.
मोकळ्या ठिकाणी असल्यास गुडघ्यात डोके घालून वाकून बसावे.
धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
‘दामिनी अॅप’चा वापर करून वीज पडण्याचा पूर्व इशारा मिळवावा.
आपत्कालीन संपर्क क्रमांक:
जिल्हा नियंत्रण कक्ष: 02352-222233 / 226248
पोलीस टोल फ्री: 112
पोलीस नियंत्रण कक्ष: 02352-222222
जिल्हा रुग्णालय: 02352-222363
महावितरण: 7875765018
व्हॉट्सॲप क्रमांक: 7057222233
तहसील कार्यालय संपर्क:
रत्नागिरी: 02352-223127 | लांजा: 02351-230024 | राजापूर: 02353-222027
संगमेश्वर: 02354-260024 | चिपळूण: 02355-252044 / 9673252044
खेड: 02356-263031 | दापोली: 02358-282036 | गुहागर: 02359-240237
मंडणगड: 02350-225236
—
#RatnagiriAlert #OrangeAlert #HeavyRainfall #IMDWarning #DaminiApp #Monsoon2025 #RatnagiriNews #WeatherUpdate
फोटो