खोदलेले रस्ते निकषानुसार पूर्ववत करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा महानगर गॅसला इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोदलेले रस्ते निकषानुसार पूर्ववत करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा महानगर गॅसला इशारा

पावसाआधी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करा, दोन दिवसांत सर्वेक्षणाचे आदेश

रत्नागिरी – शहरात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने त्वरित आणि निकषानुसार पूर्ववत करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी दोन दिवसांत सर्वेक्षण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

banner

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी वैभव गारवे, महानगर गॅस कंपनीचे आशिष प्रसाद, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर, निमेष नायर, स्मितल पावसकर उपस्थित होते.

डॉ. सामंत म्हणाले, “महानगर गॅस कंपनीने पाईपलाईनसाठी रस्ते खोदले तेथील दुरुस्ती ही त्यांच्या जबाबदारीची आहे. ती योग्य प्रकारे पूर्ण झाली पाहिजे. पावसाआधी काम संपवणे अत्यावश्यक आहे.”

सीएनजी पंपांवरील रांगा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

जिल्ह्यातील सीएनजी पंपांवरील लांबच लांब रांगांच्या पार्श्वभूमीवरही पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले असून, समांतर वितरण व्यवस्था तयार करावी असे निर्देश दिले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीतही त्यांनी स्थानिक बस सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यावर भर दिला. “नोकरदारांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


#RatnagiriNews #UdaySamant #MahanagarGas #CNGSupply #Infrastructure #रत्नागिरी #गॅसपाईपलाईन #महानगरगॅस #सीएनजी #उदयसामंत

फोटो

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...