मान्सून केरळच्या उंबरठ्यावर; कोकणात रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याचा इशारा; २५ मेपर्यंत केरळात मान्सून, रायगड-रत्नागिरीत अतिवृष्टीचा अलर्ट
मुंबई: नैऋत्य मान्सून केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्याच्या दिशेने सरकत असून हवामान विभागाने याबाबत अनुकूल स्थिती असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, दक्षिण कोकण व गोव्यालगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील तीन-चार दिवस पावसाची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जोरदार मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्याच्या भागांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला असून, वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे.
मान्सून केरळात २५ मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता असून, मुंबईत साधारण १ जूनच्या सुमारास मान्सून दाखल होऊ शकतो. सध्या अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.
#हॅशटॅग्स:
#मान्सून2025 #KeralaMonsoon #RedAlert #रत्नागिरीपाऊस #RaigadRain #WeatherAlert #IMDAlert #KonkanRain #RainUpdate
फोटो