???? आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय डिनो मोरियाच्या घरी ईडीची धाड!
मिठी नदीच्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंगचा संशय; डिनो मोरियावर चौकशीचा फास
मुंबई – अभिनेता आणि आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या डिनो मोरियाच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मुंबईतील मिठी नदीच्या कथित ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात कंत्राटदार केतन कदम याला अलीकडेच मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. डिनो मोरिया आणि केतन कदम यांचे दोन दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले जात असून, डिनोचा भाऊ सँटिनो मोरिया आणि कदमची पत्नी ‘युबो राईड्स’ कंपनीत संचालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ईडीच्या प्राथमिक तपासात, केतन कदमने डिनो मोरियाला सुमारे १४ लाख रुपयांचा आर्थिक लाभ दिला होता. यातील काही रक्कम डिनो मोरियाने आपल्या भावाच्या कंपनीकडे वळवली, अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळत आहे. त्यामुळे हा व्यवहार मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत येतो का, याचा तपास सुरू आहे.
याबाबत डिनो मोरियाने ही रक्कम ‘कर्ज स्वरूपात’ घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच डिनो मोरियाची चौकशी केली होती. या प्रकरणात काही राजकीय वरदहस्त असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. भाजप नेते दरेकर यांनी “कुणाचा वरदहस्त होता, ते लवकरच समोर येईल,” असे विधान केले आहे.
—
???? #EDRaid #DinoMorea #MithiScam #MoneyLaundering #AdityaThackeray #MumbaiNews #PoliticalConnection
—
???? फोट