सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा आणि स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा तसेच एम. एस. सी. आय.टी.च्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला
या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुरेश साळवी हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलीत करुन मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्याचे व शारदा मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांना सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचे हस्ते वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष सुरेश साळवी यांचे हस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, सौ. सावी साळवी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एम. एस. सी.आय.टी.उत्तीर्ण विद्यार्थांचा भेटवस्तू,आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यानंतर एम.एस.सी.आय.टी.च्या मार्च २०२५ मधील परिक्षेसाठी बसणा -या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते हॉलटीकीट, भेटवस्तू व आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी मधील शालांत परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा व स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, आकर्षक कापडी पिशवी व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मोहन पागडे, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी विनोद जोशी, जय शिर्के, खोडदेचे माजी सरपंच धनदिप साळवी, आयुर्वेदिक डॉ. सुभाष बहुतुले, उद्योजक गजानन साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडीटर जगदीश साळवी, वझे केळकर महाविद्यालय मुलुंडचे प्राध्यापक अमोल पवार, माजी सैनिक सुरेश साळवी यांनी विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश साळवी यांनी केले तर नीटनेटके सुत्रसंचालन माजी सरपंच अंकुश माटल यांनी केले शेवटी संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुरेश साळवी, उद्योजक गजानन साळवी, जगदीश साळवी, प्राध्यापक अमोल पवार, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी विनोद जोशी, आयुर्वेदिक डॉ. सुभाष बहुतुल्य, संदेश साळवी, अजयभाऊ खाडे, जय शिर्के,धनदिप साळवी, पत्रकार संदेश कदम, क्रिकेट पट्टू कुणाल देसाई आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली च्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्राजक्ता पवार, शुभम साळवी यांनी विशेष प्रयत्न केले