जेष्ठ पत्रकार आणि कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन जाधव यांचा मनसे तर्फे सत्कार संपन्न
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील मळण गावचे सुपूत्र, प्रेस क्लब गुहागरचे सल्लागार व जेष्ठ पत्रकार आणि गुहागर तालुका कॉग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन जाधव यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षाचे वतीने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालयात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचे हस्ते महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत गजानन जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
जाधव यांना त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुका सचिव प्रशांत साठले,उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, शेतकरी संघटना अध्यक्ष प्रसाद कुष्ठे, यांचेसह महाराष्ट्र सैनिक उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहूल जाधव यांनी केले