मासू नं.१ शाळेत विविध शैक्षणिक साहित्य वाटप दरवर्षीप्रमाणे शाळा प्रवेशोत्सवात नवागतांचे स्वागत आणि साहित्य वाटपाने सुरुवात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

???? मासू नं.१ शाळेत विविध शैक्षणिक साहित्य वाटप

दरवर्षीप्रमाणे शाळा प्रवेशोत्सवात नवागतांचे स्वागत आणि साहित्य वाटपाने सुरुवात

गुहागर| प्रतिनिधी

तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं.१ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते व मासू गावाचे भूषण मा. श्री. राजेश मासवकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. याशिवाय शाळेसाठी स्टेशनरी, शिक्षक आणि मदतनीस यांना छत्र्यांचे वाटप देखील करण्यात आले.

तसेच, मासू गावचे सुपुत्र राजेश भोजने यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले. मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप यावेळी करण्यात आले.

सा.फु.द.पा. योजनेअंतर्गत माजी मुख्याध्यापिका सौ. मृणाली महेंद्र रेडेकर यांनी शाळेसाठी ३,०००/- रुपयांची देणगी दिली.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मसुरकर, पांडुरंग नाचरे, सिमरन नाचरे, मंगेश मास्कर, संजिवनी नाचरे, आरोही मास्कर, मोहिनी आलीम, महादेव आलीम, वसंत आलीम, तसेच पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व मुख्याध्यापक श्री.  रवींद्र कुळये सर उपस्थित होते.

शाळेच्या वतीने सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.

 

 

???? हॅशटॅग्स:

#मासूशाळा #शैक्षणिकसाहित्यवाटप #शाळाप्रवेशोत्सव #समाजकार्य #रत्नागिरीवार्ताहर #SchoolDonation #RaincoatDistribution #ZPschoolMasu

???? फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...