???? Breaking News
???? खेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर!
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; बाजारपेठेत पाणी, अंतर्गत रस्ते पाण्याखाली
खेड (रत्नागिरी):
खेडमध्ये आजपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून तिचं पाणी बाजारपेठेत घुसायला सुरूवात झाली आहे.
खेड शहरातील नारंगी नदीलाही पूर आला आहे. परिणामी, शहरातील अंतर्गत अनेक रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे.
खेड नगरपरिषद प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांना सावध राहण्याचे आणि नदीनजीक न जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून सतत गस्त आणि पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
या पावसाचा फटका केवळ शहरापुरता मर्यादित नसून, खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती, वाहतूक आणि दळणवळणावरही परिणाम झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
????️ पावसाची संततधार अशीच राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
????️ #खेड_पावसाची_स्थिती #जगबुडी_नदी #रत्नागिरी #खेड_बाजारपेठ #मुसळधार_पाऊस #नरंची_नदी #FloodAlert
????️ फोटो