जीवन मावस यांची पत्रकार सुरक्षा समितीत निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जीवन मावस यांची पत्रकार सुरक्षा समितीत निवड

बातमीअहिल्यानगर नंदकुमार बागडेपाटील 

छत्रपती संभाजीनगर: सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार जीवन आनंदराव मावस यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातील पुरी येथील मावस यांनी पत्रकारिता आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे.

मावस यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून बहुजन समाजावरील अन्यायाला वाचा फोडली असून, विविध शासकीय योजनांचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. गरिबीतून वर येऊन त्यांनी कमी वयातच पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या आदेशानुसार आणि अहमदनगर जिल्हाध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील यांच्या शिफारशीनुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मावस यांना पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष नंदकुमार बगाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे आयोजित पत्रकार सुरक्षा समितीच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून पुरीचे सरपंच अविनाश राऊत, पिंपळवाडीचे सरपंच रवी आढागळे, सुदामराव आढागळे, शाहरुख पटेल, अमोल हिवाळे, शाहूल खंडागळे, दिनकर राऊत, आणि राहुल आढागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यापुढेही छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार सुरक्षा समितीत अनेकांना संधी देण्याचे आश्वासन नंदकुमार बगाडे पाटील यांनी दिले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...