वाटद खंडाला गावातील ज्येष्ठ शिक्षक व कीर्तनकार श्री दत्तात्रय बिवलकर गुरुजी यांचे निधन – परिसरात शोककळा
प्रतिनिधी:- श्री निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाला गावातील ज्येष्ठ आणि आदरणीय शिक्षक तसेच कीर्तनकार श्री दत्तात्रय बिवलकर यांचे दुःखद निधन ही अत्यंत शोकांतिक घटना आहे. “ज्यांनी मला व असंख्य विध्यार्थी हयांना घडवले”, असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल अनेक विद्यार्थी व गावकरी अभिमानाने व्यक्त करतात.
त्यांचे मार्गदर्शन, कीर्तनातून दिलेले सांस्कृतिक विचार आणि सुसंस्कार आजही अनेकांच्या मनामध्ये ठसलेले आहेत. बिवलकर सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, सुसंस्कारी विचारांचे वाहक आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या जाण्याने वाटद खंडाला गावाने एक विद्वान, संस्कारी व समाजप्रेमी व्यक्ती गमावली आहे. त्यांची शिकवण आणि स्मृती आयुष्यभर आमच्या मनामध्ये राहील.
श्री दत्तात्रय बिवलकर गुरुजी ना भावपूर्ण श्रद्धांजली!