समाजनेते रामभाऊ बेंडल स्मृतिदिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा: कुणबी समाजोन्नती संघाचा स्तुत्य उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजनेते रामभाऊ बेंडल स्मृतिदिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा: कुणबी समाजोन्नती संघाचा स्तुत्य उपक्रम

गुहागरच्या शृंगारतळी येथे २४ जुलै रोजी कुणबी समाजाचे श्रद्धास्थान, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांना आदरांजली!

आबलोली (संदेश कदम): गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे दैवत, श्रद्धास्थान, उद्धारकर्ते आणि लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा (General Meeting) देखील गुरुवारी, २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.

हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार येथे असलेल्या समाजनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका गुहागर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष पांडुरंग गणपत पाते यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडेल.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका गुहागर ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदीप गोविंद बेंडल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि वार्षिक सभेला ग्रामीण तालुका शाखेचे पदाधिकारी, सल्लागार, कार्यकारिणीचे सदस्य, तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट, तवसाळ गट आणि युवक मंडळाचे आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीचे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, तसेच गुहागर तालुक्यातील सर्व समाज बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने आणि वेळेत उपस्थित राहावे.

 

 

#RamBhauBendleSmrutiDin #KunbiSamaj #GuhagarNews #SocialLeader #श्रद्धांजली #KunbiCommunity #AnnualGeneralMeeting #शृंगारतळी #समाजकार्य #MaharashtraPolitics #RamBhauBendle

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...