📌 वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे यांच्यावरची कारवाई दुर्दैवी – अॅड. बंटी वणजू यांची टीका
कोणत्याही पक्षातील ‘कान भरणाऱ्या’ टुकार मंडळीमुळे प्रामाणिक जनसेवकांचे नुकसान – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्षांचे प्रतिपादन
रत्नागिरी :
कोकणात मनसे रुजवणारे वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर व संतोष नलावडे यांच्यावर झालेली कारवाई ही अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅड. देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू यांनी केली आहे.
ते म्हणाले की, “कोणत्याही पक्षातील नेत्यांचे कान भरणाऱ्या टुकार मंडळीमुळे नेहमीच चांगल्या जनसेवकांचे आणि पक्षाचे नुकसान होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
रस्त्यावर उतरून आंदोलने करून लोकांच्या प्रश्नांसाठी झटणारे वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर आणि संतोष नलावडे यांच्यावर अशा प्रकारची कारवाई झाली तर नवीन कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश जातो, अशी खंत वणजू यांनी व्यक्त केली.
“शेवटी काम करणारा कुठेही गेला तरी त्याचे काम थांबत नाही. वैभव खेडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून उभा राहतो, तशीच गवसणी खेडेकर आणि त्यांची टीम यशाला घालतील यात तिळमात्र शंका नाही,” असे अॅड. बंटी वणजू यांनी ठामपणे सांगितले.
🟣 हॅशटॅग्स :
#RatnagiriNews #VaibhavKhedekar #MNS #AjitPawarGroup #BuntyVanju #PoliticalNews #Konkan