🟣 कोकणात आज-उद्या होणार गणपतींचे आगमन; रात्रीपासून घुमणार भजन-आरतीचे स्वर
जिल्ह्यात तब्बल ५९ हजार मूर्तींची प्रतिष्ठापना; बाजारपेठा, गावोगावी उत्साहाचे वातावरण
रत्नागिरी :
कोकणात आजपासून गणरायाचे आगमन सुरू होत असून उद्या प्रत्येक घरोघरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जिल्ह्यात यंदा तब्बल ५९ हजारांहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
आज आणि उद्या ढोल-ताशांच्या गजरात गणपतींचे आगमन होत असून, उद्या रात्रीपासून गावागावांत आरती व भजनांचे मंजूळ स्वर दुमदुमणार आहेत. मात्र चार दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा आज सकाळपासून सुरू झाल्याने भक्तांमध्ये थोडी नाराजी दिसत आहे. अधूनमधून पाऊस उसंत घेताच गणेशशाळांतून भक्त मूर्ती घरोघरी घेऊन जात आहेत.
मुंबईसह परराज्यातून कोकणवासीय मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परतले असून, घराघरांत आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करून बाप्पाचे स्वागत केले जात आहे. बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.
गणेशोत्सवामुळे कोकणातील गावोगावी आनंदाचे वातावरण पसरले आहे. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, तो उत्सव अखेर दारात आल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह उसळला आहे. बंद घरांची टाळी उघडली असून प्रत्येक कुटुंब बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
—
कोकण गणेशोत्सव 2025
Ratnagiri Ganpati News
Konkan Ganeshotsav 2025
Ganesh Festival in Ratnagiri
Mumbai to Konkan Ganpati 2025
—
📸 फोटो
—
🔖 हॅशटॅग्स :
#Ganeshotsav2025 #KonkanGanpati #RatnagiriNews #GanpatiBappaMorya #कोकणातीलगणेशोत्सव