गुहागर मनसेच्या दणक्याने शृंगारतळीतील रस्त्याचे खड्डे बुजवले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर मनसेच्या दणक्याने शृंगारतळीतील रस्त्याचे खड्डे बुजवले

 

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा मनसेने केला गौरव

आबलोली (संदेश कदम)

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी बाजारपेठेतील पुल मार्केट येथील रस्त्यावर पडलेल्या खड्डे सर्वांनाच मनस्ताप सहन करणारे ठरत होते अखेर शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवलकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांचेसह अन्य पदाधिकारी यांनी दोन दिवसात खड्डे न भरल्यास वृक्षारोपण करू असा इशारा दिला होता.मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवरकर यांच्या मनसे दणक्याने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी खूणेकर यांचे तात्काळ खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केल्याने मनसे गुहागरच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा मनसे गुहागर यांच्याकडून गौरव करण्यात येत आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...