मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला.

मुंबई महानगरपालिकेवर विजयी झेंडा फडकवणे हेच काँग्रेसचे लक्ष्य, बीएमसीत सत्ताधारी महायुतीचा भ्रष्ट कारभार- खासदार वर्षा गायकवाड

बीएमसी निवडणुकीत आघाडीसाठी समविचारी पक्षांशी काँग्रेस चर्चा करणार.

मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिर मालाडमध्ये संपन्न.

प्रतिनिधि अरविंद कोठारी

मुंबई, दि. १५ नोव्हेंबर २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना स्पष्ट केले. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करणे व विजयरथ पुढे नेण्याचे उद्दिष्ट या शिबिरातून अधोरेखित झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. कार्यक्रमाला AICC सचिव व मुंबई प्रभारी यु. बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षाताई एकनाथ गायकवाड, सहप्रभारी रियाज रेहाना, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सहप्रभारी सचिन सावंत, विधीमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी तरुणवर्ग तसेच नवीन लोकांना जोडले पाहिजे. बुथ स्थरापर्यंत काम केले पाहिजे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्याचे काम करा. पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. पदे ही शोभा वाढवण्यासाठी दिलेली नाहीत, जे काम करणार नाहीत त्यांना पदमुक्त केले जाईल असा इशारा चेन्नीथला यांनी यावेळी दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या की, तीन वर्षापासून बीएमसीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या काळात महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. कोट्यवधी रुपये लुटले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी खर्च केल्या आहेत. मुंबईतील महत्वाच्या जागा काही खास लोकांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. काँग्रेसने बीएमसी मधील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे चव्हाट्यावर आणलेली आहेत. आगामी काळातही भाजपा महायुतीचा भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. काँग्रेस पक्ष मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईतील पाणी, वाहतूक समस्या, भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण यावर आवाज उठवत आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी दिला जात नाही पण मुंबई महापालिकेचा निधी पार्टी फंड असल्यासारख्या महायुती त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत आहे.

खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा आमचा विचार असून मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे. निवडणुका दोन महिन्यावर आल्या तरी निवडणूक आयागाने अद्याप पुरवणी मतदार यादी दिलेली नाही. मतदान आठ दिवस असताना मतदार यादी येते मग यावर काम कधी करायचे. या याद्यांमध्ये घोळ केला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. मतदार याद्या तपासा, बुथ लेवलवर जाऊन काम करा आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्यासमोर मोठे आव्हान असले तरी डगमगून जाता कामा नये. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पराभवाने खचून जात नाही, आता रडायचे नाही तर लढायचे आहे हे लक्षात ठेवा, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच लक्ष्य ठेवा आणि विजय मिळवण्यासाठी काम करा, असे आवाहन करताना त्यांनी भाजपा व आरएसएसवर तुफान हल्ला केला. आपली लढाई ही शुद्ध विचाराची आहे. भाजपा व आरएसएसच्या स्वप्नातील भारत व आपल्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म सोडायला लावणारे हेच मनुवादी विचाराचे लोक होते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश यावेळी म्हणाले की, ही निवडणूक सत्य आणि असत्य, नीतिमत्ता आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. या आव्हानाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे. मुंबईतील सर्व २२७ जागा लढवण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे.

आमदार भाई जगताप यावेळी म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर त्यांच्या पाठीशी पक्षाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २२७ उमेदवार उभे करण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे याचा अर्थ प्रत्येक वार्डात काँग्रेस पक्षाची ताकद आहे, असे भाई जगताप म्हणाले.

आरपीआयचे राजेंद्र गवईही या शिबिराला उपस्थित होते. तर शिबिराच्या दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...