लोकशाही मिशनद्वारे गुहागर तालुक्यातील 100% मुल ही एक चांगली नागरिक, सुजाण नागरिक घडवू – शेखर भिलारे

लोकशाही मिशनद्वारे गुहागर तालुक्यातील 100% मुल ही एक चांगली नागरिक, सुजाण नागरिक घडवू – शेखर भिलारे

आबलोली (संदेश कदम)

जिल्हा परिषद,पंचायत समिती स्तरावर गुहागर तालुक्यात प्रथमच लोकशाही मिशन राबवून विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल आदर निर्माण करणाऱ्या गुहागर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे आज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे भेट देण्यासाठी आले होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मिशन लोकशाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश समजावून सांगितला.

शेखर भिलारे म्हणाले की, लोकशाही मिशनद्वारे गुहागर तालुक्यातील दहा वर्षानंतर 100% मुलं ही तुम्हांला

वेगवेगळ्या पदांवर काम करताना दिसतील.त्याचबरोबर आपली 100% मुलं ही एक चांगली नागरिक, सुजाण नागरिक घडवू असा विश्वास त्यांनी या वेळेस व्यक्त केला . आणि हाच या लोकशाही मिशनचा उद्देश आहे असेही स्पष्ट मत गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की,26 नोव्हेंबरला आपण पूर्ण भारतामध्ये संविधान दिन साजरा केला आणि जेव्हा मी या तालुक्यात पहिल्यांदा पोस्टिंग साठी आलो तेव्हा मला कळाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद च्या विद्यार्थ्यांसाठी मिशन विज्ञान नावाचा एक उपक्रम चालवला जातो.आणि त्याचवेळी आपल्या गुहागर शाळेमधील शिक्षिका जोगळेकर मॅडम यांनी माझ्यासमोर एक कन्सल्ट म्हणली की, सर जसं जिल्हा मिशन विज्ञान राबवतोय तसं आपण काय राबवू शकतो का? मिशन लोकशाही वगैरे आणि ते आयडिया मला खूप चांगली आवडली आणि माझ्या मनाला भावली. आणि हे वर्ष बरोबर संविधानाला 75 वर्षे पूर्ण करणारे वर्ष आहे म्हणजे जो आपला देशाचा मूलभूत कायदा आहे त्याला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे तसंही शासनाकडून आम्हाला आदेश आले होते की, हर घर संविधान नावाचे अभियान तुम्ही राबवा मग मला असं वाटलं की याच वेळेत माझ्या मुलांना संविधानाची प्रस्ताविका न करता जर संविधानच कळाले,संविधान कसे बनवले गेले संविधानात काय अधिकार आहेत,आपली काय कर्तव्य आहेत,या देशात विविध पदांवर काम करणाऱ्या लोकांची निवड कशी होते,त्यांचे अधिकार काय आहेत. हे जर त्यांना कळले तर कुठेतरी त्यांना संविधानाबद्दल आदरही वाटेल, संविधानाबद्दल श्रद्धा वाटेल. आणि एक चांगला नागरिक, सुजाण नागरिक आपण घडवू असा विश्वासहि गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें