महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी दि. १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे रंगत आहे. राज्यातील विविध १७ महाविद्यालयांतील विद्यार्थी कलाकार या अंतिम फेरीत सहभागी झाले असून नाट्यप्रेमींना वैविध्यपूर्ण एकांकिका पाहण्याची संधी मिळत आहे.

अंतिम फेरीचे उद्घाटन दि. १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता साहित्यिक, कवी, नाटककार व निर्माते तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे माजी संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल बांदिवडेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ही तिन्ही मान्यवर काम पाहत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शब्दगुच्छ देऊन स्वागत केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना संजय कृष्णाजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्य नाट्य स्पर्धा सलग ६४ वर्षे सातत्याने आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्व संघांचे त्यांनी अभिनंदन केले. एकांकिका स्पर्धांमधून उत्तम कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि संगीतकार घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड वाढविणे तसेच नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मा. सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे या स्पर्धेला मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ८३ एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध १७ महाविद्यालयांचे संघ आपापल्या एकांकिका सादर करत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळून मराठी रंगभूमीला नव्या पिढीतील कलाकार घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. अंतिम फेरीतील सर्व एकांकिकांचा प्रवेश रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. एकांकिकांच्या प्रवेशिका नाट्यगृहावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंतिम फेरीतील सादरीकरणे पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup
nilesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना तळवली (मंगेश जाधव)-गुहागर येथील आगारातील मुख्य कार्यालयात आज...
Read More
गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना

नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्येष्ठ...
Read More
नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला

तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला तळवली (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील तळवली येथील बौद्धवाडी...
Read More
तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला

मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू

मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू   ऑस्ट्रेलिया, कॅनडा व अल्जीरियाकडून अतिरिक्त LNG-LPG आयात; IOCL,...
Read More
मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू

चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न    समाजाला कर्मकांडातून मुक्त करणे हेच सत्यशोधक समाजाचे काम :-मारुतीकाका जोयशींचे प्रतिपादन तळवली...
Read More
चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड - प्रशासनाचे दुर्लक्ष आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील गिमवी झोंबडी रस्त्याला...
Read More
गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना...
Read More
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात

पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : साप्ताहिक आम्ही मुंबईकरतर्फे...
Read More
पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात

समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे

समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे नवीमुंबई (मंगेश जाधव) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र....
Read More
समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती उत्पादनात ८० टक्क्यांची घट आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाचा...
Read More
कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती