गुहागर: तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अपंग पुनर्वसन संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्राने सन्मान

गुहागर: तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अपंग पुनर्वसन संस्थेकडून ट्रॉफी व प्रमाणपत्राने सन्मान

सामाजिक बांधिलकी जपत संकलित केला निधी; गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक

तळवली (प्रतिनिधी – मंगेश जाधव):

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील विद्यार्थ्यांचा गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने ट्रॉफी, आकर्षक प्रमाणपत्र आणि पेन देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अपंग पुनर्वसन संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे निधी संकलन केले होते. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांशी संपर्क साधून संस्थेसाठी भरघोस मदत जमा केली. या सामाजिक कार्याची दखल घेत अपंग पुनर्वसन संस्थेचे प्रतिनिधी, पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. प्रकाश बापट सर, गुहागर हायस्कूलचे श्री. जाधव सर आणि श्री. भरत कदम सर यांनी प्रशालेस प्रत्यक्ष भेट देऊन या भेटवस्तू सुपुर्द केल्या.

विशेष निधी संकलन करणारे सन्मानित विद्यार्थी:

संस्थेकडून प्राप्त झालेल्या या पुरस्कारांचे वाटप प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर आणि गुणवंत शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विशेष निधी संकलित करणाऱ्या खालील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला:

* इयत्ता ५ वी: पारदळे अनन्या शैलेंद्र, टेरवकर दुर्वा विवेक, कारकर हार्दिक जगदिश

* इयत्ता ६ वी: साळवी स्वरा प्रविण, कळंबाटे सौरभ जनार्दन, पडवेकर आयुष्य संजय

* इयत्ता ७ वी: डाफळे स्नेहल संतोष

* इयत्ता ८ वी: पडवळकर संस्कार शैलेंद्र, आदवडे मनस्वी मधुकर, भुवड हर्षदा संजय, साळवी मुकेश महेश

याप्रसंगी अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनाही ट्रॉफी, सन्मानपत्र व पेन देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधींनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्येही अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन केले.

प्रशालेच्या वतीने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन श्री. कुळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. देवरुखकर सर यांनी मानले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, श्री. केळस्कर सर आदी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

माहिती अधिकार दिनानिमित्त लांजा तालुक्यात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे प्रशासनाला निवेदन; शाळा-महाविद्यालयांत प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध स्पर्धांसह विविध उपक्रम घेण्याची मागणी

राज्य

शहर चुनें