*कोकणच्या सुपुत्राच्या गीताला वैशाली सामंत यांचा सुमधुर स्वर! 
आबलोली (संदेश कदम)
कोकणचे सुपुत्र, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, लेखक, अभिनेता आणि संकलक म्हणून ओळख असलेले तसेच सध्या साम टीव्हीमध्ये प्रोमो प्रोड्युसर म्हणून कार्यरत असलेले शशांक कोंडविलकर यांचे ‘दिवाळी आली’ हे नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.
या गाण्याचे शब्द आणि चाल शशांक कोंडविलकर यांची असून, संगीतकार संदीप भुरे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर सुप्रसिद्ध महागायिका वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला विशेष रंगत आली आहे.
T-Series या नामांकित म्युझिक लेबलअंतर्गत हे गाणे YouTube वर प्रदर्शित झाले आहे.
यंदाच्या दिवाळीत ‘दिवाळी आली’ हे गाणे आवर्जून पाहावे, ऐकावे आणि अनुभवावे.
या गाण्याच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन कोकणचे सुपुत्र, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार शशांक कोंडविलकर यांनी
रसिकांना केले आहे.












