एसटी प्रवासातील महिला सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटी प्रवासातील महिला सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

**महिला प्रवाशांना दिलासा; ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून NCMC कार्ड नोंदणी व वितरण करण्याचे परिवहन महामंडळाचे निर्देश

*मुंबई :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी आवश्यक करण्यात आलेल्या NCMC कार्डच्या सक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला प्रवाशांसाठी NCMC कार्डची अनिवार्यता १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप NCMC कार्ड नोंदणी न झालेल्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एसटी महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता आतापर्यंत केवळ १.१० कोटी NCMC कार्डची नोंदणी व वितरण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिलांची अद्याप कार्ड नोंदणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर महामंडळाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे महिला प्रवाशांसाठी NCMC कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतीत सर्व महिला लाभार्थ्यांनी आपले NCMC कार्ड नोंदणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.

या विशेष शिबिरांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.

त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला प्रवाशांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें