CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उबदार ब्लँकेटचे वाटप; मरीन लाइन्स ज्युनिअर चेंबर चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

पनवेल – संदीप शेमणकर
धामणी, पनवेल येथे
ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला हातभार लावत मरीन लाइन्स ज्युनिअर चेंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या CSR उपक्रमांतर्गत ज्ञानाई माध्यमिक विद्यालय, धामणी (ता. पनवेल, जि. रायगड) येथे विद्यालयाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन आणि शुभारंभ सोहळा शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
या प्रकल्पासाठी एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड, स्वस्तिक ग्लास प्रायव्हेट लिमिटेड, बॉम्बे केमिकल इक्विपमेंट्स आणि डी. एम. मेटलॉईज प्रायव्हेट लिमिटेड यांनी आर्थिक सहकार्य केले. ट्रस्टच्या ‘ज्ञानगंगा प्रकल्पा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. युगराज बी. जैन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे JCI सिनेटर डॉ. जीवराज शाह यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ट्रस्टचे अध्यक्ष JCI सिनेटर बाबूलाल गांधी यांनी ट्रस्टच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत शिक्षण क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या गरजा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित अध्यक्ष २०२७ Jc. HGF सतीश मेहता यांनी केले. यावेळी JCI सिनेटर सुमेर मुनोत, जेसी यश शाह, जेसी अमित शेठ, जेसी मिहिर जैन, जेसी दिव्यांश भंडारी आणि श्री. राजेश मांडवकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यालय व्यवस्थापन व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें