जैतापूर येथे निवारा शेडचे थाटात उद्घाटन; ग्रामस्थांकडून आमदार किरण सामंत यांचे स्वागत

जैतापूर येथे निवारा शेडचे थाटात उद्घाटन; ग्रामस्थांकडून आमदार किरण सामंत यांचे स्वागत

 

जैतापूर, ता. राजापूर :

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते जैतापूर येथील नूतन निवारा शेडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

 

नारळ वाढवून व फीत कापून या शेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जैतापूर परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार सामंत यांचे गावात स्वागत करण्यात आले.

 

*निवारा शेडमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा*

 

जैतापूर हे राजापूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव असून येथे दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार वर्गाची ये-जा असते. बसची वाट पाहताना उन्हा-पावसात उभे राहावे लागत होते. ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून हा निवारा शेड उभारण्यात आला आहे.

 

या शेडमुळे आता प्रवाशांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळणार असून बसची वाट पाहणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच गावातील बैठका, कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांसाठीही या शेडचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

*विकासकामांना गती*

 

राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व सामाजिक सुविधा यासाठी आमदार किरण सामंत सातत्याने प्रयत्नशील आहेत. गावागावात विकासकामे मार्गी लावून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यावर त्यांचा भर आहे. जैतापूर निवारा शेड हे त्याच विकासाच्या मालिकेतील एक काम असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

पुढील काळातही जैतापूर व परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

*मान्यवरांची उपस्थिती*

 

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसेना नेते रविंद्र नागरेकर, तालुका प्रमुख दिपक नागले, सभापती नंदिनी कदम, राजापूर अर्बन बँक चेअरमन अॅड. शशिकांत सुतार, माजी सभापती अजित नारकर, युवा अध्यक्ष सुनिल गुरव, महिला तालुका संघटक सिद्धि शिरसेकर, पं.स. सदस्य जानवी गावकर, उपविभागप्रमुख राजन कोंडेकर, सत्यवान आडिवरेकर, सम्रादनी शिरवडकर, साक्षी शिरवडकर, सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी, अरविंद लांजेकर, जुनेद मुल्ला, नाटे विभागप्रमुख मनोज आडविरकर, माजी विभागप्रमुख नंदू मिरगुले, माजी सरपंच बलवंत सुतार, सर्पराज काझी, सरपंच राजप्रसाद राऊत, शाखाप्रमुख प्रसाद करगुटकर, प्रसाद माजरेकर, सुबोध माजरेकर, हर्षद माजरेकर, सनी करगुटकर, पंकज पाटील, संदीप चव्हाण, साईं करगुटकर, सागर करगुटकर, पिंट्या शिरवडकर, सोहम माजरेकर, दीपेश दुधवडकर, समिर शिरवडकर, निखिल आडिवरेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैतापूर शाखेचे पदाधिकारी, युवासेना व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शाखाप्रमुख प्रसाद करगुटकर यांनी मानले.


 

बातमी – प्रशांत पोवार 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें