गुहागरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर प्रकार; मुंबईत दिला बाळाला जन्म

गुहागरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर प्रकार; मुंबईत दिला बाळाला जन्म

 

इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अत्याचार झाल्याचा आरोप; २९ वर्षीय तरुणाला अटक, पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आबलोली (संदेश कदम) :

गुहागर तालुक्यातून अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख निर्माण करून अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप २९ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित मुलीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची गुहागर तालुक्यातीलच २९ वर्षीय तरुणाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. कालांतराने दोघांमधील संपर्क वाढला. त्यानंतर संबंधित तरुणाने मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेतून मुलगी गर्भवती राहिली आणि तिने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुहागर पोलिसांनी संशयित २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सोशल मीडियाच्या वापराबाबत पालकांमध्ये चिंता

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी निर्माण होणाऱ्या संपर्काचे गंभीर परिणाम या घटनेतून समोर आले आहेत. अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें