सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार तळवली हायस्कूल च्या कु. माही मयेकर हिला प्रदान.

तळवळी (प्रतिनिधि मंगेश जाधव)-
चतुरंग प्रतिष्ठानच्या “सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार” कु. माही प्रकाश मयेकर हिला दि.19 जानेवारी 2025 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे जागतिक कीर्तीचे लेखक ख्यातनाम अभिनेते श्री दीपक करंजीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ट्रॉफी, प्रमाणपत्र, एक हजार रुपये रोख रक्कम व पाचशे रुपयाची पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमारी माही मयेकर हिचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी- विद्यार्थिनी तर्फे सत्कार करण्यात आला व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.















