पूर्वा नाटेकरला निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक
पूर्णगड (ता. रत्नागिरी) – जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नं. १ मधील विद्यार्थिनी पूर्वा जगदीश नाटेकर हिने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शासकीय निबंध स्पर्धेत उच्च प्राथमिक गटात उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त २०२४-२५ या वर्षात छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पूर्वाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले असून बक्षिसाची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तारये मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि पालक वर्गाने तिचे अभिनंदन केले. तसेच केंद्रप्रमुख संजय राणे सर यांनी तिच्या या यशाचा गौरव केला. या यशासाठी तिला मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे आणि राजेंद्र रांगणकर यांचे मार्गदर्शन लाभले.