पीएमश्री अंतर्गत शाळांचा गोवा राज्यात अभ्यास दौरा
रत्नागिरी – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या माध्यमातून पीएमश्री या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत केंद्रीय प्रकल्प मंडाळाने मान्य केलेल्या प्रस्तावामधील शिक्षकांसाठी अभ्यास भेट / दौरा (Exposure visit for teachers)रत्नागिरी जिल्ह्यातील PM SHRI (PRIME MINISTER SCHOOL FOR RISING INDIA) शाळांचा दौरा राज्यांतर्गत व राज्याबाहेरील शैक्षणिक संस्था मध्ये दिनांक १७ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ यादरम्यान पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण १३ पीएमश्री शाळा असून त्यामधील एकूण २४ मुख्याध्यापक शिक्षक व अधिकारी अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार आहेत या दौऱ्यांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथे भेट होईल. यामध्ये शैक्षणिक संस्था क्षेत्रात नवीन संकल्पना उपक्रम यावर चर्चा होईल. तदनंतर वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार कुडाळ या संस्थेस शिक्षक भेट देतील. त्यानंतर गोवा राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सायन्स सेंटर गोवा, गोवा ओशिओनाग्राफी , एससीईआरटी गोवा तसेच गोवा राज्यातील पीएमश्री शाळांना भेटी देऊन तेथील अध्ययन अध्यापन पद्धती, नावीन्यपूर्ण उपक्रम यांचा अभ्यास करणार आहेत व सर्व चांगल्या उपक्रमांचा रत्नागिरी जिल्ह्यात वापर सुरू करण्यात येणार आहे. सदर अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी चे प्राचार्य श्री.सुशील शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. राहुल बर्वे, श्रीम. अनुपमा तावशीकर, श्रीम.दीपा सावंत, अधिव्याख्याता श्रीम.सीमा इंगळे अधीक्षक श्री.शैलेश सुर्वे व सर्व कार्यालयीन कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य मिळत असुन संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन व संचालन पीएमश्री शाळांचे जिल्हा नोडल अधिकारी श्री राजेंद्र लठ्ठे हे पाहत आहेत