महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सुरक्षा समिती महत्त्वाची – यशवंतराव पवार
आहिल्यानगर – महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी आपली सुरक्षा स्वतः केली पाहिजे आणि यासाठी पत्रकार सुरक्षा समिती या संघटनेत सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. यशवंतराव पवार यांनी व्यक्त केले.
कोकण विभागीय पत्रकार सुरक्षा समितीच्या अधिवेशनात प्रमुख भाषण देताना पवार यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक संधी मिळावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे. तसेच पत्रकारांसाठी सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करण्यासाठी ही संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या अधिवेशनास महाराष्ट्रातील अनेक पत्रकार उपस्थित होते. आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी व जिल्हाध्यक्ष नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, भविष्यात पत्रकारांसाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.