रत्नागिरीत दशावतार प्रयोगात्मक कलाशिबिराचे उद्घाटन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीत दशावतार प्रयोगात्मक कलाशिबिराचे उद्घाटन

रत्नागिरी: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित दशावतार प्रयोगात्मक कलाशिबिराचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

या वेळी दशावतार क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र शासनाच्या लोककला पुरस्काराने सन्मानित मा. यशवंत तेंडुलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा देत, “या महाविद्यालयातून अनेक प्रतिभावान कलाकार घडावेत,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद सर, सतीश शेबडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांसह मोठ्या संख्येने कोकणी कलाकार उपस्थित होते.

 

हा उपक्रम लोककला संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, दशावतार संस्कृतीला नव्या उंचीवर नेणारा असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...