श्रीमान योगी युवक प्रतिष्ठान कामोठे नवी मुंबई येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
नवी मुंबई (मंगेश जाधव)-पनवेल तालुक्यातील कामोठे येथील श्रीमान योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने सेक्टर २०सेट्रल बँक चौक कामोठे येथे शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात फटाक्याच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सञामध्ये शिव प्रभु मुर्ती पुजन भारत माता प्रतिमा पुजन व आरती करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर संध्याकाळच्या सञामध्ये महीलाचे सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी ७वा.स्वरांजली बँड पथक लालबाग यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला श्रीमान योगी युवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.दिगंबर पाटील उपसचिव श्री. दशरथ अर्जुन खजिनदार श्री. राकेश शिरावळे सदस्य श्री.सुनिल जुवाटकर श्री.करण कांबळे श्री.शंकर जेष्ठ शिव भक्त गणपत अर्जुन तांत्रिक साहाय्यक संतोष हकारे सल्लागार दिपक आंब्रे हे मान्यवर उपस्थित होते.