गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयाचे विज्ञान रंजन परीक्षेत सुयश
प्राथमिक गटातून कु. संकल्प सुधाकर भोजने गुहागर तालुक्यात प्रथम
आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळामार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विज्ञान रंजन परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयाने याही वर्षी आपल्या उज्वल यशाचा यशस्वी ठसा उमटवला आहे, यामध्ये प्राथमिक गटातून कुमार संकल्प सुधाकर भोजने याने गुहागर तालुक्यामध्ये मध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याचप्रमाणे विविध गटातील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे गट क्रमांक एक
1) कुमार संकल्प सुधाकर भोजने ( गोल्ड मेडल )
2 )आराध्या अमोल पवार (सिल्वर मेडल )
3 )चैतन्य दीपक वैद्य ( ब्रॉंझ मेडल)
गट क्रमांक दोन
1 )सुमित सुनील पागडे ( गोल्ड मेडल)
2) अक्षरा संदेश सावंत-( सिल्वर मेडल )
3 ) समृद्धी सुधाकर भोजने ( ब्रॉंझ मेडल )
गट क्रमांक तीन
1) श्रेयस सतीश विचारे ( गोल्ड मेडल )
2) अलमास फेरोजअली सौदागर ( सिल्वर मेडल )
3 )सोहम प्रसन्ना सुर्वे ( ब्रॉंझ मेडल )
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले, विद्यालयाचे प्राचार्य श्री. धनाजी गिरी ,शिक्षक शिवाजी भोसले,नितिन जगताप,वैभव ढवळ,दिनेश नेटके,रामू अहिरे, परमेश्वर व्हनमाने,सौ.श्वेता कदम यांच्याकडून या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले, त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिनशेठ बाईत व संस्थेच्या सर्व कार्यकारणी कडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.