गुहागर तालुक्यातील नवानगर काताळे येथे तीन कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार, घरावर हल्ले – प्रशासनाचे दुर्लक्ष
गुहागर : तालुक्यातील नवानगर काताळे गावामध्ये तीन कुटुंबांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बहिष्कार टाकण्यात आला असून त्यांच्यावर वारंवार हिंसक हल्ले होत आहेत. स्थानिक राजकीय दबाव व गावातील काही दादागिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने हे कुटुंब अत्याचार सहन करत आहेत. विशेष म्हणजे, पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
गावाने बहिष्कृत केलेली कुटुंबे
1. रवींद्र कमलाकर खारवटकर यांचे कुटुंब
2. मधुकर कृष्णा अजगोलकर यांचे कुटुंब
3. दीपक कृष्णा अजगोलकर यांचे कुटुंब
गावातील काही लोकांनी राजकीय पाठबळाचा वापर करत या कुटुंबांना वाडीतून बहिष्कृत केले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना गावातील सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
हनुमान मंदिरात प्रवेशबंदी
गावातील हनुमान मंदिर सर्व गावकऱ्यांच्या वर्गणीने बांधण्यात आले आहे. मात्र, प्रभाकर भाग्या कोलकांड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या तीन कुटुंबांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. इतकेच नव्हे, तर मंदिरातून काही जणांना जबरदस्ती हाकलण्यात आले.असेही त्यांनी निवेदनात दिले आहे. हे कितपत योग्य?
वारंवार जीवघेणे हल्ले
गेल्या दोन वर्षांत या कुटुंबांवर अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत.
घरावर हल्ला: या कुटुंबांच्या घरावर गावातील काही जणांनी दोन वेळा हल्ला केला.
शारीरिक मारहाण: महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना निर्घृण मारहाण करण्यात आली.
महिलांचा विनयभंग: हल्लेखोरांनी महिलांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.
जीव घेण्याच्या धमक्या: पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
गुहागर पोलिसांचे निष्काळजीपण.
या घटनांबाबत तक्रार करण्यासाठी मधुकर अजगोलकर गुहागर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. महिलांना व वृद्धांना झालेल्या मारहाणीचे स्पष्ट पुरावे असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले. स्थानिक राजकीय दबावामुळे आरोपींना पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पाणी योजनेतील राजकारण..
गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून गावातील महिलांनी वर्गणी गोळा करून 1200 मीटर लांबीचा पाईप बसवला. मात्र, महेश नाटेकर यांनी हा खर्च आपण केल्याचा खोटा दावा करून या तीन कुटुंबांचे पाणी बंद करण्याचा आदेश दिला. असे तक्रार दार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मधुकर अजगोलकर यांनी शासकीय जलजीवन योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, संबंधित यांनी राजकीय स्वार्थासाठी ही योजना रोखण्याचा प्रयत्न केला. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे काम स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला. असा आरोप बहिष्कृत असणारे मधुकर अजगोलकर यांनी केलाय.
स्थानिक प्रशासनाकडे न्यायाची मागणी
या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला आयोग, स्थानिक आमदार भास्कर जाधव, आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही ही तक्रार कळवण्यात आली आहे.
???? नवानगर काताळे मध्ये होणार ???? श्री हनुमान जयंती जोरदार साजरी बातमी साठी क्लिक ◀️
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार लोकांवर कठोर कारवाई व्हावी आणि बहिष्कृत कुटुंबांना न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.
सामाजिक कर्यकर्ते यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन.
काताळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश सु. खारवटकर यांनी पीडित कुटुंबाना न्याय मिळावा या साठी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
न्याय मिळेल की अन्यायाचा विजय होईल?
लोकशाहीत अशा अमानुष घटना घडत असतील तर कायद्याचा धाक उरला आहे का? पीडित कुटुंबांना न्याय मिळेल की पुन्हा एकदा अन्यायाचा विजय होईल? आता सर्वांच्या नजरा प्रशासनावर लागल्या आहेत!
वार्ताकंन- सुजित सुर्वे, पडवे